लातूर: सेवानिवृत्त शिक्षकाचे दिवसाढवळ्या २० हजार लुटले | पुढारी

लातूर: सेवानिवृत्त शिक्षकाचे दिवसाढवळ्या २० हजार लुटले

चाकूर, पुढारी वृत्तसेवा: येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या खिशातील २० हजार रुपये दिवसाढवळ्या लुटल्याची घटना बुधवारी ( दि.४) दुपारी घडली. शिवदयाळ शेटे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २८ हजार रुपये पेन्शन काढून घेतली.

शेटे यांनी पॅन्टच्या खिशात २० हजार आणि आठ हजार शर्टच्या खिशात ठेवले होते. ही रक्कम घेऊन घराकडे जात असताना ग्रामीण रुग्णालयाच्या कोपऱ्यावर साठे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते आले असता समोरुन ॲटो आला व त्यातील चौघांनी शिवदयाळ शेट यांना सर तुम्हाला तिथपर्यंत सोडतो, असा आग्रह धरून त्यांना ॲटोमध्ये बळजबरीने बसवले आणि थोड्या अंतरावर शिंदे यांना त्यांच्या घराशेजारी सोडून ते पसार झाले.

दरम्यान, शिवदयाल शेटे यांनी किराणा दुकानाची बाकी देण्यासाठी शर्टाच्या खिशातील ८ हजारांतील काही रुपये दिले. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे टाकण्यासाठी एका ऑनलाइन सेंटरवर गेले आणि खिशात हात घातला असता वीस हजार रुपयांचे बंडल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत शेटे यांनी चाकूर पोलिसांत तक्रार दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button