

लातूर, पुढारी वृत्तसेवा : निलंगा आणि औराद शहाजनी तालुक्यात आज (दि.९) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हासुरी येथे सकाळी ६.३० च्या सुमारास जमीन हादरली. २.८ रीश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झाला. त्यानंतर सकाळी १०:४३ व १०:४९ वाजता दोन सौम्य धक्के व आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर त्याची नोंद झाली आहे. (Latur Earthquake )