Zilla Parishad Jalna : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'सुपर 50'
जालना : जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर सर्वसाधारण प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 'सुपर ५०' हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून मुलांना डॉक्टर व इंजिनिअर होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दिशा देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
सन २०२५ मध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून दरवर्षी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यांना दोन वर्षांचे सखोल मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या निकालावर व निवड परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज खालील लिंकवर भरावेत :
https://forms.gle/U7AqvniknsjFQLjv6 जिल्हा परिषदेच्या, अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील. लेखी व तोंडी परीक्षा यांच्या आधारे अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाईल. हा उपक्रम Quality Cost-Based Selection (QCBS) पद्धतीनुसार निवडलेल्या शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांनी आणि इतर नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून इतर ग्रामीण विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधावा. मिन्नू पी. एम., मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रमुख वैशिष्ट्ये अशी...
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण.
IIT-JEE व NEET या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी विशेष तयारी. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पूर्णपणे मोफत.
QCBS पद्धतीनुसार निवडलेल्या नामांकित संस्थांमार्फत प्रशिक्षण.

