

जालना : भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील अवैध दारू विक्री व सट्टा मटका आणि पत्ते आदी जुगार बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी नारायण साबळे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांनी कारवाईचे लेखी पत्र दिले. त्यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, सरपंच मंगेश साबळे इत्यादींच्या हस्ते नारळ पाणी पिऊन मंगळवारी (दि.28) रोजी सायंकाळी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्व काकडे, सामाजिक कार्यकर्ते सरपंच मंगेश साबळे या मान्यवरांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जालन येथील अधिकारी पाटील, दुय्यम निरीक्षक सोनवणे, भोकरदन पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे, नायब् तहसीलदार पाटील, नारायण लोखंडे प्राध्यापक अंकुश जाधव, सुरेश गवळी, सुरेश तळेकर, उपस्थित होते-