Jalna Crime News : घरात घुसून युवकांचा लाठ्या-काठ्यांनी हल्ला

शहरात गाडीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन टोळक्याकडुन तीन तरुणांवर लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
Crime news
Crime newsFile Photo
Published on
Updated on

Youths entered the house and attacked with sticks

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरात गाडीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन टोळक्याकडुन तीन तरुणांवर लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना भोकरदन नाका परिसरातील पोलिस चौकीजवळ घडली. या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला असुन इतर दोन जण जखमी आहेत. मुख्य रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Crime news
Vande Bharat : जालन्यात 'वंदे भारत' रेल्वेची म्हशीला धडक

जालना शहरात गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने भोकरदन नारका परिसरात तिघा भावंडावर दगडे, लाठ्या काठ्यांनी अमानुष व प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना पोलीस चौकीसमोर घडली.

दरम्यान तिघा भावंडापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप भारती यांनी रुग्णालयात पोहचुन जख्मीची विचारपुस केली.

Crime news
Jalna Agriculture News : रब्बीमध्ये बदलाची नवी वाट, राजमा पिकाच्या लागवड क्षेत्रात होतेय वाढ

दरम्यान हल्ला करणाऱ्या तिघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news