Jalna Agriculture News : रब्बीमध्ये बदलाची नवी वाट, राजमा पिकाच्या लागवड क्षेत्रात होतेय वाढ

घनसावंगी तालुक्यात पारंपरिक पिकासोबत राजमाची शेती
Jalna Agriculture News
Jalna Agriculture News : रब्बीमध्ये बदलाची नवी वाट, राजमा पिकाच्या लागवड क्षेत्रात होतेय वाढFile Photo
Published on
Updated on

A new path of change in Rabi, there is an increase in the area under cultivation of Rajama beans

अविनाश घोगरे

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा या पांरपारीक पिकासोबत आता राजमा या नवीन पिकाची लागवड शेतकरी करतांना दिसत आहे. यामुळे पारंपरिक पिकासोबत शेतकरी नवीन पिकाकडे वळतांना दिसत आहे.

Jalna Agriculture News
Cold Weather : उबदार कपड्यानी आठवडे बाजार गरम

घनसावंगी तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि हरभरा ही पारंपरिक पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यातील हवामान, मर्यादित पाणीपुरवठा आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेता अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मदार या पिकांवरच राहिलेली आहे.

मात्र, काळाच्या ओघात शेतीपध्दतीतही बदल घडू लागले असून आता शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच नव्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. बदलत्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे राजम्याचे पीक आता घनसावंगी तालुक्यातही हळूहळू रुजू लागले आहे. यावर्षी काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर राजम्याची लागवड केली असून या पिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Jalna Agriculture News
Vande Bharat : जालन्यात 'वंदे भारत' रेल्वेची म्हशीला धडक

राजमा हे पीक तुलनेने कमी कालावधीत येणारे, कमी पाण्यावर तग धरणारे तसेच बाजारात चांगला दर मिळवून देणारे आहे.

क्षेत्र वाढवणार 'दरवर्षी ज्वारी, गहू, हरभरा घेतो. मात्र या पिकात उत्पन्न कमी व खर्च वाढल्याने हातात काही उरत नव्हते. तिन वर्षा पासून राजम्याची लागवड केली. राजमा पिकाला पाणी कमी लागते, पीक छान तग धरून आहे. बाजारातही भाव समाधानकारक आहे. जर यंदाचे उत्पादन बऱ्यापैकी आले तर पुढच्या वर्षी राजम्याचे क्षेत्र वाढवायचा विचार आहे.
-लक्ष्मण आनंदे, शेतकरी मासेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news