

Jalna Accident News
शहागड : अबंड तालुक्यातील पांगरखेडा येथे गुरुवारी (दि.15) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकी व कारमध्ये अपघात झाला. यात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला. शुभम वसंत किडे (वय २४, रा. बोधलापुरी ता. घनसावंगी) असे मृत युवकाचे नाव आहे.
शुभम हा दूध व्यवसाय करत होता. बोधलापुरीहून अंबडकडे जात असताना पांगरखेडा जवळ समोरून येणाऱ्या कारला धडक होवून त्याचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबड येथील खासगी व नंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.