

भोकरदन : तालुक्यातील भोरखेडा या गावापासून जवळच असलेल्या खुपटा या फाट्यावर अजिंठा बुलढाणा या महामार्गावर दुचाकीचा व कारचा भीषण अपघात दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास झाला आहे. यामध्ये कार क्रमांक एमएच 14एल पी 6542 व दुचाकी क्रमांक mh 21 BK 1334 या दोन्हीही वाहनांचा भीषण अपघात झाला , यामध्ये दुचाकी वर असलेला तरुण नामे संतोष तुकाराम गवळी वय 28 वर्षे राहणार धावडा तालुका भोकरदन हा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर कार मध्ये असलेल्या प्रवाशांनी तात्काळ या तरुणाला इतर गाड्या थांबून बुलढाणा येथे उपचारासाठी हलवले होते. त्याच्यावर बुलढाणा येथील घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.