Jalna Crime News : दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसांसह तरुणाला बेड्या

'जळगाव' कनेक्शन उघड! ; मुक्ताईनगरवरून विकायला आणली होती अग्निशस्त्रे; मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू
Jalna Crime News
Jalna Crime News : दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसांसह तरुणाला बेड्याfile photo
Published on: 
Updated on: 

Youth arrested with two pistols, seven live cartridges

जालना, पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगरवरून विकायला आणलेल्या दोन पिस्तूलासह तरुणाला कदीम जालना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विशाल कॉर्नर परिसरात अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार, दि. ७ रोजी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे आणि आयफोन असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही अमिशस्त्रे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Jalna Crime News
Sambhajinagar News : चारा जिल्ह्याबाहेर विक्रीला बंदी

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामदास काळे यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली होती की, विशाल कॉर्नर परिसरातील भवानीनगर रोडवरील साई ढाब्या जवळ एक व्यक्ती बेकायदेशीर घातक शस्त्रांसह उभा असल्याची माहितीवरून कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष कारवाई पथक तैनात करण्यात आले.

पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास साई ढाब्याजवळ संशयितरीत्या थांबलेल्या एका तरुणाला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे घातक अग्निशस्त्रे आढळून आली. कडक चौकशीदरम्यान आरोपी भीमा वाघमारे याने ही पिस्तूल व काडतुसे समाधान निकम (रा. रामुक्ताईनगर, जि. जळगाव) याच्याकडून विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची कबुली दिली आहे.

Jalna Crime News
Gunthewari : गुंठेवारीतून पाच वर्षांत मनपाच्या तिजोरीत ३५९ कोटी

शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना अभिशस्त्रे बाळगल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन पुरणलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी भीमा वाघमारे व समाधान निकम यांच्याविरुद्ध शख्य अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार मच्छिंद्र बाळाभाऊ वाघ करत आहेत. ही धड़क कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामदास काळे, पोलीस अंमलदार कावळे, राठोड, शेख व खान यांच्या पथकाने यशस्वीरीत्‍या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news