Water Shortage : चिंताजनक ! अर्ध्याहून अधिक लघु प्रकल्प कोरडेठाक !

६७ प्रकल्पांत केवळ १२.४६ टक्के पाणीसाठा; तब्बल ३४ धरणांनी गाठला तळ !
Water Shortage
Water Shortage : चिंताजनक ! अर्ध्याहून अधिक लघु प्रकल्प कोरडेठाक !File Photo
Published on
Updated on

Worrying! More than half of the minor projects are bone-dry!

जालना, पुढारी वृत्तसेवाः जून महिना संपत आला तरी जालना जिल्ह्यात अद्याप मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाने २५ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण ६७ मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये आता केवळ १२.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३४ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य झाला असून, ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे.

Water Shortage
Jalna dams water level : तलावांनी गाठला तळ; पाणीसाठा 18 टक्क्यांवर

जिल्ह्यातील एकूण ६० लघु प्रकल्पांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. अहवालानुसार, या ६० लघु प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत, तर तब्बल ३० प्रकल्पांमधील पाणी पातळी जोत्याच्या खाली गेली आहे.

Water Shortage
Water Scarcity In Beed : जलसाठ्यात घट; बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

म्हणजेच जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लघु प्रकल्पांमधून सध्या एक थेंबही उपयुक्त पाणी मिळणे कठीण झाले आहे. या ६० लघु प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता १८१.३७ दशलक्ष् घनमीटर (दलघमी) असताना, प्रत्यक्षात केवळ १२.५१ दलघमी (६.८९ टक्के) साठा शिल्लक आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news