

Raid on gambling den in Jalna; 21 people including eight women against case filled
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील गुरू गोविंदसिंग नगरातील जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करुन ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांमधे आठ महिला, दोन अल्पवयीन मुलांसह २१ जणांचा समावेश आहे.
सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांना खबऱ्याने माहीती दिली की, गुरुगोविदसिंग नगर येथील रहीवाशी हिरासिंग मंगलसिंग टाक यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील रुममध्ये काहो महिला व पुरुष गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी व सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती -यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक म्हस्के, पोलिस कर्मचारी कावळे, रंगे, जाधव, महिला पोलिस गायकवाड, केदार व जाधव यांच्यासह दोन पंचासह पोलिसांनी छापा मारला.
यावेळी हामसिंग रामसिंग कलाणी, सचिनसिंग हामसिग कलाणी, बालुसिग इंदसिंग टाक, बालअपचारी हिरसिंग हिरासिंग टाक, विबर्रासग हिरासिंग टाक, हिरासिंग मंगलसिग टाक, दियासिंग व-हामसिंग कलाणी, सुनिलसिग हिरासिग टाक, करण नपार्णासग जुन्नी भारतसिंग हुक्कमसिंग टाक, शंकर लहुजी लोखंडे बालअपचारी यांच्यासह आठ महीला तिर्रट नावाचा जुगार खेळतांना मिळून आल्या. त्यांच्या ताब्यातुन रोख ६ हजार ७० रुपये, तीन दुचाकी, १३ मोबाईल असा ३ लाख ४२ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार शिंगणे हे करीत आहे सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोप-खेळाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, जमादार रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, गणेश तेजनकर, पोलिस कर्मचारी राहुल कटक्म, शारदा गायकवाड, महिला पोलिस शालु केदार, ज्योती जाधव यांनी केली.
जालना शहरासह जिल्ह्यातील काही गावातील आठवडी बाजारातही तिर्रट व झन्ना मन्ना जुगार खेळला जात आहे. पोलिसांच्या कारवाई नंतरही जुगार खेळणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी शेतातही जुगाराचे अड्डे बहरले असल्याचे चित्र आहे.