जरांगे यांचा सल्लागार कोण? ओबीसी नेते हाके यांचा सवाल

जरांगे यांचा सल्लागार कोण? ओबीसी नेते हाके यांचा सवाल

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : ओबीसींना आरक्षण मिळाले म्हणजे सगळे प्रश्न सुटत नाहीत. आरक्षण म्हणजे रेशन वाटपाचा कार्यक्रम नाही. मनोज जरांगे जी बाजू मांडतात ती बरोबर आहे, पण त्याला ओबीसी आरक्षण हाच पर्याय नाही. जरांगे यांचा सल्लागार आहे तरी कोण? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी केला.

राज्यात आतापर्यंत आमच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला पाहिजे होती. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते असून शासनाला आमची दखल घ्यावीशी वाटत नाही, पण मायबाप सरकार, ओबीसीची भाषा समजून घ्या. आमची दखल नका घेऊ, पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केली.

कुणबी आणि मराठा यांच्यात फरक आहे. ते कायदेशीरद़ृष्ट्या वेगवेगळे असल्याचे हाके म्हणाले. महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकद़ृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्यावर न्याय मिळतो, असे कोणी सांगितले? आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. शासनकर्ते खरे बोलायला तयार नाहीत, ते दूर पळत आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळतो हे चुकीचे असल्याचेही हाके म्हणाले.

हाकेंच्या प्रकृतीला धोका : डॉक्टरांना भीती

लक्ष्मण हाके यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी उपचार घेतले नाहीत तर परिस्थितीत आणखी गंभीर होऊ शकते, असा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे. उपोषणामुळे लक्ष्मण हाकेंना थकवा आला असून, त्यांचे ब्लडप्रेशर वाढले आहे. उपोषण सोडण्याची आम्ही विनंती केली; परंतु ते ऐकत नाहीत. त्यांचे वजनही घटले आहे. शुगर, पल्स नॉर्मल आहेत. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यांच्या मेंदूवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news