Jalna News : पांढऱ्या तुरीला ७,८०० तर राईला ७,९५० रुपयांचा सर्वोच्च दर !

जालना बाजार समितीत १ कोटी ३२ लाखांहून अधिकची उलाढाल
Tur Price in Market Yard
Jalna News : पांढऱ्या तुरीला ७,८०० तर राईला ७,९५० रुपयांचा सर्वोच्च दर !pudhari photo
Published on
Updated on

White tur fetches a peak rate of ₹7,800, while mustard reaches ₹7,950!

जालना, पुढारी वृत्तगसेवा : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. शुक्रवार, ३ रोजी बाजार समितीत पांढऱ्या तुरीला ७ हजार ८०० रुपये तर राईला ७ हजार २५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

Tur Price in Market Yard
Sorghum News : ज्वारीला सोन्याचा भाव; ज्वारी ४,८०० रुपयांवर

दरम्यान, जालना कृषिमूल्य बाजारपेठेत शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून बाजारात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या दि.३ रोजीच्या दैनंदिन अहवालानुसार बाजार समितीत विविध शेतमालाची एकूण ३ हजार ५५३ क्विंटल आवक झाली असून, दिवसभरात तब्बल १ कोटी ३२ लाख ६० हजार ६३२ रुपयांचे एकूण मूल्यांकन (उलाढाल) झाले आहे.

या बाजार अहवालानुसार, बाजारात पांढऱ्या तुरीला कमाल ७ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला असून सर्वसाधारण दर ७ हजार ७०० रुपयांवर स्थिरावला आहे. तर राईची आवक कमी असली तरी तिला ७ हजार ९५० रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला आहे.

Tur Price in Market Yard
अर्थवार्ता : म्युच्युअल फंडात पैशांचा पाऊस! मार्चमध्ये ४०,४५० कोटींची गुंतवणूक

गहू, ज्वारी आणि सोयाबीनची सर्वाधिक आवक बाजार समितीत '४९६' जातीच्या गव्हाची सर्वाधिक १ हजार ४१ क्विंटल आवक झाली असून, त्याला कमाल २,६७८ रुपये दर मिळाला. त्याखालोखाल 'शाळू' ज्वारीची ९७३ क्विंटल आवक झाली असून ज्वारीला ५ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. पिवळ्या सोयाबीनची आवक देखील ४०५ क्विंटल झाली असून सोयाबीनला ६ हजार ७०० रुपांचा कमाल आणि ६ हजार ६०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला आहे.

लाल जातीच्या मक्याची सर्वसाधारण आवक २१० क्विंटल इतकी झाली आहे. कमाल भाव २ हजार ३७० तर किमान भाव २ हजार २१२ तर सर्वसाधारण भाव २ हजार २५० इतका मिळाला आहे. चमकी मूग सध्या बाजारात दाखल झाले आहे. सुमारे २७ क्विंटलची आवक झाली आहे. सरासरी चमकी मुगाला ६ हजार ८४१ इतका भाव मिळाला आहे. लिंबोळीची आवक ११ क्विंटल इतकी झाली आहे. क्विंटलला १ हजार रुपये इतका दर मिळा आहे. जालना बाजार समितीत सुमारे ३ हजार ५५३ क्विंटल मालाची आवक झाली आहे.

या संदर्भात बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे आणि सचिव भरत तनपुरे यांनी बाजार समितीत आलेल्या मालाची उलाढाल, बाजार भाव आदींची माहिती दिली आहे.

कडधान्ये आणि तेलबियांच्या दरात तेजी

गावरान हरभऱ्याची ३४४ क्विंटल आवक झाली असून त्याला ५,७७६ रुपये कमाल दर मिळाला, तर काबली हरभऱ्याला ६ हजार ४२५ रुपयांचा एकसमान दर मिळाला. बाजारात चमकी मुगाची २७ क्विंटल आवक झाली असून त्याला ६ हजार ८४१ रुपयांचा चांगला दर लाभला.

सूर्यफुलाची २० क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण भाव ६ हजार ६५० रुपये राहिला. करडईची आवक केवळ क्विंटल झाली असून झाली कमाल भाव ५ हजार तर किमान भाव ५ हजार रुपये मिळाला असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news