hospital water shortage : अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई

वीज गायब होत असल्याने नवजात बालकांची हेळसांड
hospital water shortage
अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाईpudhari photo
Published on
Updated on

सुखापुरी ः अंबड उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून, रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः प्रसूती विभागातील माता आणि नवजात बालकांना पाणीटंचाई, उकाडा आणि वीजपुरवठा खंडित होण्याचा गंभीर फटका बसत असल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून, बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर केवळ शोभेची वस्तू बनले आहेत.

hospital water shortage
Nevasa Water Problem: नेवासा शहरात तीव्र पाणीटंचाई; जुनी योजना आणि बेकायदेशीर जोडण्या कारणीभूत

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्रसूती विभागातील महिलांना अक्षरशः उकाड्यात रात्र काढावी लागत आहे. पंखे बंद, वातानुकूलन यंत्रणा निष्क्रिय आणि अंधाराचे साम्राज्य अशा परिस्थितीत नवजात बालकांसह मातांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून आले.

hospital water shortage
New Water Supply Scheme : लिटरभर पाणीही आले नाही; अन् वीज बिल गेले कोटींवर

काही नातेवाईकांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांची सेवा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, कायमस्वरूपी पर्यायी वीज व्यवस्था उभी करावी तसेच प्रसूती विभागातील सुविधा सुधाराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news