

जालना : पाण्याच्या विज्ञानाचे महामार्ग उघडणारे जलसंसाधन विशेषज्ञ व आयआयटी दिल्लीचे प्रा. ए. के. गोसाई जालना फर्स्टच्या पुढाकाराने 17 डिसेंबर रोजी आयोजित मंथन परिषदेसाठी जालन्यात येत आहेत. नदी, हवामान आणि शहर या तिघांमध्ये संबंध जोडण्यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
भारताच्या पाणीव्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख नाव असलेले प्रा. ए. के. गोसाई यांचा जलसंधारण, हवामानबदल, नदीप्रवाह विश्लेषण, आणि जलस्रोत नियोजन या विषयांमध्ये तज्ञ आहेत. देशभरातील जलव्यवस्था प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असताना, गोसाईं यांचे काम अधिकच महत्त्वाचे ठरत आहे. गोसाईं यांची खासियत म्हणजे ते पाणी हे केवळ संसाधन नाही, तर जीवंत प्रणाली आहे हे समजतात.
गोगाई सांगतात शहरांमध्ये येणारे पूर हे फक्त पावसामुळे होत नाहीत तर ते शहरांच्या वाढीच्या पद्धती, डोंगर-कड्यांचे उपयोग, जमिनीतील बदल, आणि माणसाच्या सवयींशी थेट जोडलेले असतात. त्यामुळे उपाययोजना करताना विज्ञान, समाज आणि प्रशासन तिन्हींच्या सांधण्या एकत्र येतात.
या दृष्टिकोनामुळेच त्यांच्या संशोधनांनी अनेक शहरांना विशेषत: पाण्याच्या कमतरतेशी झुंजणाऱ्यांना उपाय आणि रणनीती दिल्या आहेत. प्रा. गोसाईं हे अत्याधुनिक मॉडेलिंग, सॅटेलाइट डेटा, हवामान-पॅटर्न आणि नदीच्या प्रवाहाचा अभ्यास वापरून जलव्यवस्थापनाचे चित्रच बदलून टाकतात.या मंथन परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
शहरांसाठी प्रेरणा
अनेक भारतीय शहरे आज पाणीटंचाई, सांडपाणी व्यवस्थापन, पूरस्थिती आणि भूजल घटण्याच्या संकटांना सामोरी जात आहेत. गोसाईं यांच्या कल्पना या केवळ तांत्रिक नसून कार्यक्षम पायाभूत बदलांचे मार्गदर्शन आहेत. जालनासारख्या शहरात, जे जलस्रोत आणि भविष्यातील विकास या दोन्हींच्या संवेदनशील वळणावर उभे आहे, त्यांच्या कल्पना आणि अनुभव किती मोठा बदल घडवू शकतात याची कल्पनाच पुरेशी आहे.