पाणवठ्यात सोडले ट्रॅक्टरद्वारे पाणी

वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था
jalna news
पाणवठ्यात सोडले ट्रॅक्टरद्वारे पाणीfile photo
Published on
Updated on

Water released into the water body using a tractor.

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील धावडा सह परिसरामध्ये वनविभागाकडून तहावाढत्या उन्हाची तीव्रता आणि कोरड्या पडत चाललेल्या नैसर्गिक जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धावडा या वनक्षेत्रांत वन विभागाने पुढाकार घेत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून कोरडे पडलेले पाणवठे तुडुंब भरले आहेत.

jalna news
Rural water supply project : पाणीटंचाई निवारण्यासाठी 5.17 कोटी रुपयांचा आराखडा

या संवेदनशील मोहिमेमुळे बिबट्या, हरिण नीलगाय सांबर व इतर प्राणी साठी टँकरद्वारे धावडा परिसरातील पाणवठ्यांत पाणी टाकण्यात आले. आणि माकडांसारख्या वन्यजीवांच्या घशाची कोरड भागली आहे धावडा शिव रारातील पाणवठ्यांमध्ये तीन टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले.

या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने वन्यप्राणी होरपळून निघाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पवार योगेश डोमळे आणि वनमजूर यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण केली परिसरातील जंगलातही पाणी पोहोचवण्याचे नियोजन वन विभागामार्फत सुरू आहे.

jalna news
Sambhajinagar News : नव्या २५०० च्या जलवाहिनीतून ढोरकीनपर्यंत पाणी दाखल

वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी अशा प्रकारे टँकरने कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकले जात आहे जंगलातही जलपुरवठा परिसरातील मुख्य पाणवठे टँकरच्या सहाय्याने भरण्यात आले. पाणवठ्यात पाणी सोडल्याने जगंलातील प्राणी पक्ष पक्षी यांच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. नियमित पाणी सोडणार आहे.

उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळतात, ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता असते हा धोका टाळण्यासाठी जंगलातच पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
-ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक भोकरदन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news