Jalna News : लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी चिंता वाढविणारी

७ मध्यम व ६० लघु प्रकल्पांत केवळ ९ टक्के जलसाठा, दहा महिने कसे जाणार ?
Jalna News
Jalna News : लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी चिंता वाढविणारीfile photo
Published on: 
Updated on: 

Water levels in small and medium projects are a cause for concern

जालना, पुढारी वृत्तसेवा :

जालना जिल्ह्यातील ७ मध्यम व ६० लघु प्रकल्पातील पाणी साठ्याची स्थिती चिंताजनक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ७मध्यम व ६० लघु प्रकल्पांमध्ये ऑक्टोबर महिन्यातच केवळ ९.६९ टक्के जलसाठा शिल्लक असल्यामुळे आगामी दहा महिने कसे जाणार असा गंभीर प्रश्न जिल्हावासीयांसमोर उभा आहे. आगामी काळात पाणी टंचाईची दाहकता उग्र रूप घेण्याची भीती आहे.

Jalna News
Soybean : सोयाबीनचे एकरी एक क्विंटलचे उत्पादन

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प हे शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने - महत्त्वाचे जलस्रोत आहेत. यावर्षी जिल्ह्यात पडलेल्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर मोठे पाऊस पडले नसल्याने जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होऊ शकली नाही. लघु व मध्यम प्रकल्प कोरडे पडल्याने विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत मोठी घट होऊन अनेक ठिकाणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच दम तोडल्याचे पहावयास मिळाले. लघु व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा कमी असल्याने आगामी दहा महिन्यांत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. २०१२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर संकट यावर्षी पिण्याच्या पाण्याचे राहणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही डोके वर काढणार आहे. पाऊस न पडल्यास रब्बीची पेरणीही होणार नसल्याने जनावरांसाठी चारा आणायचा कोठून असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांसमोर उभा आहे.

Jalna News
Jalna News : उसाला प्रति टन पाच हजार रुपयांचा दर द्या

जिल्ह्यासमोरील पाणी संकट अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने आठही तालुक्यांतील तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जल है तो कल है अशी म्हणण्याची वेळ आता जालनेकरांवर आली आहे. जालना जिल्ह्यात १ जुन ते ८ ऑक्टोबरदरम्यान ४५० मिमी पावसाची नोंद आहे. गतवर्षी याच कालावधीत ८३७ मिमी पावसाची नोंद आहे. जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जलसाठे झपाट्याने कोरडे पडत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news