Jalna News : उसाला प्रति टन पाच हजार रुपयांचा दर द्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी
Jalna News
उसाला प्रति टन पाच हजार रुपयांचा दर द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Pay a rate of five thousand rupees per tonne for sugarcane

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : चालू गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा, तसेच मागील गाळप हंगामातील उसाला एफ.आर.पी. अधिक ३०० रुपये प्रति टन अंतिम दर देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Jalna News
Navratri Festival : मत्स्योदरी नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

माजी मंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यंदा चालू हंगामात राज्यात ऊस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. सध्या बाजारात साखरेला मिळणाऱ्या विक्रमी दरामुळे पहिली उचल ४२०० रुपये आणि अंतिम बिल ५ हजार रुपये प्रति टन असा ऊसदर जाहीर करावा, तसेच मागील गाळप हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एफ.आर.पी. अधिक ३०० रुपये प्रति टन अंतिम दर देण्यात यावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

Jalna News
Jalna News : दुष्काळग्रस्त भागाची माजी मंत्री महादेव जानकरांकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना केवळ एफ.आर.पी.च्या आधारे ऊसदर निश्चित करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. साखर व उपपदार्थांच्या बाजारमूल्यात वाढ होत असल्याने त्याचा योग्य हिस्सा ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील हंगामातील ऊसाला एफ.आर.पी. अधिक ३०० रुपये अंतिम दर देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, अंबड तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके आणि युवा नेते राहुल गढेकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news