Gutkha Seized : ६१ लाखांचा गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

भोकरदन पोलिसांची कारवाई; आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Gutkha Seized
Gutkha Seized : ६१ लाखांचा गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हाfile photo
Published on
Updated on

Gutkha worth ₹61 lakh seized; case registered against two

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (१२ ऑगस्ट) भोकरदन शहराजवळ करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर यांना खबऱ्याने माहिती दिली की, आयशर वाहनातून प्रतिबंधित गुटखा भोकरदन येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल बांगर व पथकाने सिल्लोड भोकरदन रोडवर साईप्रसाद हॉटेलजवळ खासगी वाहनाने सापळा रचला.

Gutkha Seized
Jalna News : कामगारांच्या योजनांवर अधिकारी, दलाल गब्बर !

आयशर (क्रमांक आर.जे. ०९ जी.ई. ७४११) या संशयास्पदरीत्या येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबविले. चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. त्यावेळी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला व ZN-1 जाफरानी जर्दा मोठ्या प्रमाणात आढळून आला.

Gutkha Seized
Crime News : 'न्यू राधिका लॉज अँड बार'मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई

२१ लाखांचा पानमसाला जप्त

झडतीमध्ये २१ लाख ९३ हजार ७५० रुपये किमतीचे १४ हजार ६२५ पुडे पानमसाला, १४ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे १४ हजार ६२५ पुडे जाफरानी जर्दा तसेच २५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news