Vitthal Nirmal Dindi : कुंभारझरी येथील दिंडीला 'विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार

आषाढी वारी दरम्यान शिस्तबद्ध, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिंड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संस्थानाच्या वतीने 'उत्कृष्ट दिंडी पुरस्कार' प्रदान करण्यात येतो.
Vitthal Nirmal Dindi
Vitthal Nirmal Dindi : कुंभारझरी येथील दिंडीला 'विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारfile photo
Published on
Updated on

'Vitthal Nirmal Dindi' Award for the Kumbharzhari Dindi

जालना, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी दरम्यान शिस्तबद्ध, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिंड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संस्थानाच्या वतीने 'उत्कृष्ट दिंडी पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. यंदा जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील हभप सोनुने गुरुजी बाबांच्या दिंडीला' विठ्ठल निर्मल दिंडी व्दितीय पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे गौरविण्यात आले.

पुरस्काराच्या मूल्यमापनाचा आणि वारीतील व्यवस्थांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कुंभारझरी (ता. जाफराबाद) येथील 'वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान'च्या स्वग्राम ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या वेळी दिंडीतील शिस्तबद्धता, पर्यावरणपूरकता आणि वारकरी परंपरेचे पालन पाहून विश्वस्तांनी दिंडीचे कौतुक केले.

Vitthal Nirmal Dindi
Jalna snake bite cases : जालना जिल्ह्यात सर्प दंशाच्या घटनांमध्ये घट; २०२५ मध्ये ४० तर २०२६ मध्ये केवळ ९ रुग्ण

हभप सोनुने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ही पायी दिंडी पंढरपूरात आहे. वारीतील दिंड्यांचा दर्जा, वारकऱ्यांची शिस्त आणि सोयी-सुविधांची पाहणी करण्याच्या उद्देशाने पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी मोरे, हभप प्रकाश जवंजाळ आणि हभप माधवी निगडे यांनी या दिंडी सोहळ्यास अचानक भेट दिली.

पारंपरिक भजन, सर्व वारकऱ्यांचा एकच गणवेश आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक व्यवस्था पाहून हभप विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांनी, आदर्श आहे," असा अभिप्राय दिला. तसेच विश्वस्त हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांनी इतर दिंडी सोहळ्यांनीदेखील या दिंडीचा आदर्श.

विश्वस्त मंडळाचा सत्कार

वारीतील शिस्त व परंपरा जपणाऱ्या दिंड्यांना प्रोत्साहन देणे हा या पाहणी भेटीचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी 'वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान' च्या वतीने देवस्थानच्या विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शालिकराव म्हस्के, भगवान गायकवाड, भगवानराव चव्हाण, सुनील वायाळ आणि दिंडीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vitthal Nirmal Dindi
जालन्यातील प्रतिपंढरपुरात दुमदुमले 'भज गोविंदम्'चे सूर

महिला वारकऱ्यांच्या शिस्तीची विशेष नोंद

दिंडीत सहभागी झालेल्या महिला वारकऱ्यांच्या शिस्तीबद्दल बोलताना विश्वस्त हभप माधवी निगडे म्हणाल्या की, "एकाच गणवेशातील महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती आणि वारीतील त्यांचे योगदान हे या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news