

Vegetable prices have fallen, farmers have not even met their expenses.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : येथील आठवडे बाजारात टोमॅटो ५ तर कोबीला ३ रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना तोडणी व वाहतूक खर्चही न मिळाल्याने ते अडचणीत सापडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोला ५ रुपये तर कोबीला ३ रुपये किलोचा भाव मिळल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली.
अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने मिळेल त्या भावात भाजीपाला विकत संताप व्यक्त केला. नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसतांनाच पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने शेतीला पर्याय म्हणून तालुक्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. यावर्षी निसगनि भरभरून साथ दिली असल्याने पिंपळगाव रेणुकाई परिसरातील वरूड, रेलगाव, शेलुद, लेहा, मुर्तड, देहड, सुरगंळी, करजगाव, कल्याणी, पद्मावती, वालसांवगी, कोठाकोळी, हिसोडा यांच्यासह विदर्भ खान्देश आदी भागांतील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करीत टोमॅटो, कोंबी, वांगे, शेवगा, मिरची, कोथबीर, मेथी, गवार, मुळे, गाजर, वटाणा आदी भाजीपाल्यांची लागवड रात्रंदिवस मेहनत घेऊन मोठ्या प्रमाणात केली आहे.
मागील दोन ते तीन आठवड्यांपासून पडत्या भावामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हताश झाले आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी भाजीपाला शेतीत जनावरे सोडत असल्याचे चित्र आहे पिंपळगावच्या आठवडे बाजारात बत्तीस खेड्यातील ग्रामस्थ येतात. विविध व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. भाव मिळत नसल्याने विक्रीसाठी आण-लेल्या भाजीपाल्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. भाजीपाल्याला भाव नसल्याने तो न विकता घरी घेउन जाता येत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात तो विकावा लागत आहे.