Jalna News : जि.प.शाळेचे विद्यार्थी राज्यात झळकले

वडोद तांगडा : प्रज्ञा शोध परीक्षेत तीन विद्यार्थी प्रथम
Jalna News
Jalna News : जि.प.शाळेचे विद्यार्थी राज्यात झळकलेfile photo
Published on
Updated on

Vadod Tangda: Three Students Secure First Place in Talent Search Examination

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा :

भोकरदन तालुक्यातील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या परीक्षेत नऊ विद्याथ्यपैिकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामुळे केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ढोल ताशांच्या गजरामध्ये गावामधून भव्य मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Jalna News
पुसद प्रकल्पात 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडोद तांगडा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच एवढे विद्यार्थी जिल्ह्यात व राज्यात झळकले असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी. आर. तांदूळजे, समाजसेवक वर्धमान वासकर, उपसरपंच नाना पाटील तांगडे, तुळशीराम तांगडे, पंढरीनाथ तांगडे, नारायण तांगडे, ओम दूध डेअरीचे संचालक गजानन तांगडे, शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक जे. वाय. सय्यद, केंद्रप्रमुख विलास पळसकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पाटील यांनी तर आभार विलास पळसकर यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jalna News
Hingoli News : स्मार्ट थ्रेशर रोखणार मळणी यंत्रावरील मजुरांचे अपघात

विद्यार्थ्यांमध्ये आनंद

शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बारामती कॅटल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर येथील माधव बोरसे व श्री ट्रेडर्स सिल्लोड मॅनेजर कृष्णा हांडोले यांच्यातर्फे २४५ विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व टिफिन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news