Unseasonal Rain : आडगाव झेडपी शाळेवरील पत्रे उडाले

अवकाळी पावसामुळे शाळेचे अतोनात नुकसान
Unseasonal Rain
Unseasonal Rain : आडगाव झेडपी शाळेवरील पत्रे उडालेfile photo
Published on
Updated on

Unseasonal Rain: Roof Sheets Blown Off Adgaon ZP School

आडगाव, पुढारी वृत्तसेवा :

भोकरदन तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Unseasonal Rain
Unseasonal rain : वडवणी डोंगर पट्ट्यात अवकाळी पावसाचा फटका

अचानक आलेल्या वादळामुळे एका वर्खखोलीवरील टिनपत्रे पूर्णतः उडून गेली. त्यामुळे सदर वर्गात पावसाचे पाणी साचले असून शैक्षणिक नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देणे कठीण झाले असून चिंता केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापनाने संबंधित प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news