पिंपळगाव रेणुकाई ः अवकाळी पावसामुळे मक्याचे पीक आडवे झाले. तर विद्युत तार तुटलेली दिसून येत आहे.pudhari photo
पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा पाऊस झाल्याने मका, गहू पीक भुईसपाट झाले तर अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शेतातील विद्युत तारा तुटून पडल्या आहे.
पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकळी पाऊस झाल्याने शेतात उभे असलेली पिके आडवी झाली. यात मका, हरभरा, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे माल काढणीला आले होते. त्या शेतकऱ्यांनी काढून आपले माल जमा करून ठेवले होते.
काही शेतकऱ्यांचे माल हे शेतात उभा असल्याने त्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

