Jalna unseasonal rain damage : 364 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा

44 गावांतील 2 हजार 566 शेतकरी बाधित
Jalna unseasonal rain damage
डोणगाव ः अवकाळी पावसामुळे आंबे गळून पडल्याने शेतकरी जमा करताना. (छाया ः शेख फेरोज)
Published on
Updated on

जालना : जालना जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 1 हजार 364 हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे.44 गावातील 2 हजार 566 शेतकरी अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत.

जालना जिल्ह्यात गुरुवारी हवामान विभागाच्यावतीने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशानानेही शेतकरी व नागरीकांना अलर्टचा इशारा दिला होता. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा बी सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.फळबागांनाही अवकाळीचा फटका बसला आहे.आंब्याचा मोहर व छोट्या कैऱ्या वादळी वारे, गारपीट व पावसामुळे गळून गेल्या आहेत.

Jalna unseasonal rain damage
Jal Jeevan Mission corruption : कारी येथे ‌‘जल जीवन‌’चा बोजवारा; भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

घनसांवगी तालुक्यातील अूनेक गावांना अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल प्रशासनाच्यावतीने युध्दस्तरावर करण्यात आली असून या पाहणीत 44 गावातील 2 हजार 566 शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अवकाळी पावसामुळे 1 हजार 364 हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, कांदी बी सह आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.अूनेक ठिकाणी उशिरा पेरलेला गहू वादळी वारा व पावसामुळे झोपला आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.

Jalna unseasonal rain damage
vaccination drive Jalna : माता-बाल संगोपन व लसीकरणावर भर
  • हवामान विभागाच्यावतीने देण्यात येत असलेल्या यलो अलर्टच्या इशाऱ्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.अूनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेडनेटसह गुरांच्या गोठ्यावरील व घरावरील पत्रे उडाली आहेत. अवकाळीने घातलेल्या थैमानामुळे अूनेक गावात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news