वरुड - जाफराबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; १ ठार, २ जण जखमी

Jalna accident | सोनखेडा फाट्याजवळ घटना
 Jalna accident
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः वरुड बु. - जाफ्राबाद रस्त्यावरील सोनखेडा फाट्याजवळ टिप्पर व मोटार सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना जालना येथे रूग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज (दि.१) दुपारी घडली. अपघातात अरबाज सत्तार पठाण याचा मृत्यू झाला. तर पंकज दिलीप बदर, आदिनाथ मनोहर जाधव (वय २३, सर्वजण रा. सोनाटी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हे दोघे गंभीर जखमी झाले. (Jalna accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन तरूण जाफराबाद येथील महाविद्यालयाकडे जात होते. यावेळी सोनखेडा फाट्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अरबाज सत्तार पठाण याचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना जालना येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. स्थानिक नागरिकांनी जाफराबाद पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे घटनास्थळी दाखल झाले.

 Jalna accident
जालना: महाशिवरात्रीला आपेगाव विज्ञानेश्वर येथे बम बम भोले चा गजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news