जालना: महाशिवरात्रीला आपेगाव विज्ञानेश्वर येथे बम बम भोले चा गजर

Mahashivratri 2025: हजारो भाविकांनी घेतले विज्ञानेश्वरांचे दर्शन
Apegaon Vigneshwar temple
आपेगाव विज्ञानेश्वर येथे भगवान विज्ञानेश्वराची आकर्षक सजावट महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आलेली होती. pudhari photo
Published on
Updated on

शहागड : अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर आपेगाव येथे बुधवारी महाशिवरात्र असल्याने पहाटेपासूनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. व्हीआयपीसह महिला पुरुषांची वेगळी रांग असून सुद्धा एक किलोमीटर पर्यंत बसण्यासाठी रांग लागलेली होती. यावेळी भगवान महादेवाच्या पिंडीची पुजाऱ्यांनी आकर्षक सजावट केली होती. सकाळी आरती होऊन महादेवाच्या दर्शनाची सुरुवात झाली.

दुपारी पुन्हा दोन वाजेच्या सुमारास आरती झाली. यावेळी भाविक भक्तांनी आरतीचा लाभ घेतला. तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व फराळाची सोय करण्यात आलेली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. तसेच ट्राफिक सुमारे दोन किलोमीटर पर्यंत लावण्यात आलेली होती. तरीही वेळोवेळी ट्राफिक जाम होत होती. यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर,उपनिरीक्षक इब्राहिम शेख, जमादार माऊली कंटुले, शंकर परदेशी,पो.कॉ.लोखंडे, गिरी महाराज यांनी चोख बंदोबस्त केला.

माजी मंत्री राजेश टोपे, मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी दुपारच्या सुमारास दर्शन घेतले. यावेळी बम बम भोले चा गजर भाविक भक्तांनी केला. यावेळी आपेगाव येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राहत पाळणे, खेळणी, गोड खाद्यपदार्थ, पूजेच्या वस्तू आधीच या ठिकाणी बाजारात सजलेल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news