Ganesh Chaturthi : दोन कोटींचा अनोखा बाप्पा थाटात विराजमान

मूर्तीचे वजन १०८ किलो, भाविकांची गर्दी
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi : दोन कोटींचा अनोखा बाप्पा थाटात विराजमान File Photo
Published on
Updated on

Unique Bappa worth two crores

जालना, पुढारी वृत्तसेवा : रिध्दी-सिद्धीचा दाता, विघ्नहर्ता गणरायाचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात असलेल्या एका गणेश मंडळातर्फे १०८ किलो वजनी चांदीची सोन्याचा (सुवर्ण) मुलामा असलेल्या दोन कोटींचा गणपती बाप्पांच्या मनमोहक मूर्तीस जल्लोष आणि थाटात विराजमान करण्यात आले.

Ganesh Chaturthi
Jalna News : गृहनिर्माण अभियंता लाचेच्या सापळ्यात

खामगाव येथून जालना शहरातील बडी सडक स्थित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ रुपम हॉल येथून सजविलेल्या रथात मूर्तीची मंडळ स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. संबळ वाद्यांचा गजरात सदस्यांनी ठेका धरत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, असा जल्लोषात गजर केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news