मराठा आरक्षणासाठी दोन युवकांनी होर्डिंग्जवर चढून घेतले अंगावर पेट्रोल

मराठा आरक्षणासाठी दोन युवकांनी होर्डिंग्जवर चढून घेतले अंगावर पेट्रोल
jalna news
मराठा आरक्षणासाठी दोन युवकांनी होर्डिंग्जवर चढून घेतले अंगावर पेट्रोल pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा युवकांनी मुंडण करून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मराठा प्रतीकात्मक तिरडी काढून शहरातून अंत्ययात्रा काढली. सदर अंत्ययात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून निघून समशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले, मराठा आमदार खासदाराची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी दोन युवकांनी बसस्थानक परिसरात असलेल्या लोखंडी होर्डिग्जवर चढून पेट्रोल अंगावर ओतून घेतल्याने पोलिस प्रशासनाची धावाधाव झाली. युवकांची समजूत काढूनही ते उतरत नसल्याने अखेर नगर पालिकेचा अग्निशामक बंब बोलावून पोलिसांनी दोन्ही युवकांना होर्डिंग्जवरून खाली उतरवले.

गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मराठा संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ बुधवारी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाजातील युवकांनी मुंडण करून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी आमदार, खासदारांची प्रतिमा लावलेली तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून काढण्यात आलेली अंत्ययात्रा समशानभूमीत नेण्यात आली. तेथे अंतिमसंस्कार करण्यात आले. दरम्यान मराठा संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना सत्ताधारी आणि विरोधक नेते गप्प आहेत. या सर्वाचा निषेध म्हणून सत्तेतील आमदार आणि खासदार तसेच विरोधी पक्षातील आमदार-खासदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सर्व राजकीय नेत्यांचा निषेध केला. यावेळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आत्महत्येचा प्रयत्न

आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बस स्थानका समोरील होर्डिंग बॅनरवर चढून सुनील शिरसाट (रा. वाकडी) तर सुरज रोडे (रा. जैनपूर कठोरा) या दोन युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

jalna news
कुकाण्यात अतिक्रमित बांधकामावरून राडा; कार्यकर्त्यांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news