Jalna Crime : धारदार हत्याराने युवकाचा खून

एक जण ताब्यात : व्यापारी नगरात खुनाचा बाजार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
Jalna Crime
Jalna Crime : धारदार हत्याराने युवकाचा खूनfile photo
Published on
Updated on

The young man was murdered with a sharp weapon

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील मंगळबाजार भागातील वलीमामु दर्गा परिसरात शनिवारी पहाटे एका युवकाचा जुन्या भांडणाच्या कारणातून धारदार हत्याराने खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Jalna Crime
Rajureshwar Temple Donation : राजुरेश्वराच्या चरणी 10 लाखांची देणगी

जालना शहरात मागील काही दिवसांपासून वांरवार खुनाच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरीकांत प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. जालना शहरात शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आपसातील भांडणातून धारदार शस्त्राने वार करून शाहेद सगीर शेख या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

घटनास्थळी सदर बाजार पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. जुन्या वादातून सदर खून झाल्याची माहिती ऐकावयास मिळाली. या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप भारती करीत आहे.

Jalna Crime
Tur Dal Market Rate : कृषी बाजारात तुरीला 8650 उच्चांकी भाव

जालना शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत खुनाच्या घटनांमधे मोठी वाढ झाली आहे. अंबड तालुक्यातील पारनेर येथे २४ जानेवारी रोजी पवन बारोटे या मुलाचा अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने भोसकुलन खून केला होता. त्यापूर्वी २३ जानेवारी रोजी चरण रायमुलकर या युवकावर शहरातील जिल्हा रुग्णालय रस्त्यावर करण्यात आलेल्या गोळीबारीमधे चरणचा खून करण्यात आला होता. यापुर्वी अंबड चौफुली परिसरात एका जणाची कारमधे हत्या करण्यात आली होती.

सुरक्षेचा प्रश्न

शहरात वाढत्या खुनाच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमधे दहशतीचे वातावरण असून पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news