

Two acres of chilli crop uprooted and discarded due to a viral outbreak
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सेलूद परिसरात शिमला मिरची पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी औषध फवारणी करून व्हायरस आटोक्यात येईना. यामुळे हतबल झालेल्या शेतकर्याने दोन एकर शिमला मिरचीचे पीक उपटून फेकले आहे.
सेलूद येथील शेतकरी यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनावर शिमला मिरची लागवड केली होती. सुरुवातीला पीक चांगले आले होते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून पानावर पिवळे ठिपके, पानगळ व फळे लहान होण्याची लक्षणे दिसू लागली. व्हायरस आटोक्यात न आल्याने शेतकऱ्याने २ एकरांतील मिरची उपटून जमिनीत गाडले.
सततच्या ढगाळ वातावरणाचा परिणाम
आता संपूर्ण गुंतवणूक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. सेलूद परिसरात गेल्या वर्षीही काही ठिकाणी असाच व्हायरस दिसून आला होता. त्यामुळे यापुढे बियाणे उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. सध्या शेतात उपटलेली मिरची झाडे दिसून येत आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रसार वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.