Road Robbery Case : रोड रॉबरी प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार तासांत चोरीचा ट्रक पकडला
Road Robbery Case
Road Robbery : रोड रॉबरी प्रकरणातील दोन आरोपी जेरबंदCrime File Photo
Published on
Updated on

Two accused in road robbery case arrested

शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक थांबवीत ट्रकचालकाच्या डोळ्यात काही तरी फेकून ट्रक चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना गोंदी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत पकडण्यात यश मिळवले. या कारवाईत ट्रकसह ३६ लाख ३३ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Road Robbery Case
Jalana Scam News | अनुदान घोटाळा : आणखी अकरा महसूल अधिकारी निलंबित

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर अहिरवार कपंनीचा ट्रक (क्र.एम एच २० डिई ४१०६) हा माल घेऊन कर्नाटकातील बिदर येथे जात असताना दोन जणांनी ट्रकला हात दाखवून थांबविले. यावेळी ट्रक्चालकाने ट्रक थांबविताच आरोपींनी ट्रक चालकाच्या डोळ्यात काही तरी फेकून त्याला ट्रकखाली ओढत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी मालासह ट्रक पळवून नेला.

गोंदी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचालक लालसिंग अहीरवार यास शहागड येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर ट्रक चोरून घेऊन जाणारा बंडू ऊर्फ रामेश्वर भीमराव वाघमारे (रा. महाकाळा) व समाधान बबन बेंद्रे (रा. अंकुशनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरून नेलेला मालट्रक व कंपनीचा माल असा ३६ लाख ३३ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Road Robbery Case
Jalna News : जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी

या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द ट्रकचालक लालसिंग अहीरवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधिक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक किरण हावले, पोलिस जमादार रामदास केंद्रे, पो. का शाकेर सिध्दीकी यांनी केली आहे. तपास किरण हावले हे करीत आहेत.

आरोपींना पोलिस कोठडी

या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद ट्रकचालक लालसिंग अहीरवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना अबंड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news