Tur Prices : जालन्यात तुरीचे भाव दहा हजारांवर

जालना मोंढ्यात नवीन तूर दाखल; सोयाबीन आठ हजारांवर
Tur Prices
Tur Prices : जालन्यात तुरीचे भाव दहा हजारांवरfile photo
Published on: 
Updated on: 

Tur prices cross ten thousand in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना मोंढ्यात दुष्काळामुळे तुर, सोयाबीनसह इतर शेतीमालाची आवक कमी होत असल्याने भाव तेजीत आहेत. नवीन तुरीचे आवक सुरु झाली आहे. नवीन तुरीला ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचे भाव मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे भावही आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहे.

Tur Prices
Jalna House Burglary : चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफासह दोन जणांना अटक

जालना मोंढ्यात तुरीची आवक छत्रपती संभाजी नगर कडून सुरु झाली द आहे. तुरीला सध्या कमीत कमी ९ हजार ५०० ते १० हजार ५००भाव मिळत आहे. तुरीची आवक सध्या २०० पोत्याची होत आहे. दुष्काळामुळे भविष्यात तुरीचे भाव अजुन वाढण्याची शक्यता आहे. गत वर्षापेक्षा यंदा तुरीची आवक खूप कमी राहण्याची शक्यता असल्याची माहीती प्रसाद ट्रेडिंग कंपनी चे संचालक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले मोंढ्यात सोयाबीनचे भाव दररोज वाढत आहेत. भाव वाढण्याच्या अपेक्षेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्येच ठेवली आहे.

त्यांना भाव दहा हजार रुपये मिळण्याची अपेक्षा आहें. मोंढ्यात सोयाबीनची आवक दररोज कमी होत असल्यामुळे सोयाबीनचे बाजार दररोज वाढत आहेत. सोयाबीनची आवक दररोज ५००० ते ६००० प्रतिक्विंटल असुन सोयाबीनचे ग्रीन गोड ७८०० ते ८०००, विस्तारा भाव ७९०० ते ८०००, अवरेज सोयाबीन ७७५० प्रतिक्विंटल आहे.

Tur Prices
Jalna News : अंबड शहरात वाहनांची धोकादायक वाहतूक

जालन्या मोंढ्यात माकाची दररोज ७०० ते १००० क्विंटलची आवक होत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मकाला चांगले भाव मिळत आहे. मकाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण रब्बीचे पीक नसल्यात जमा असल्यामुळे मकाची भाव वाढण्याची शक्यता आहे. मकाची आवक राजूर, बदनापूर, टेंभुर्णी परिसरातुन होत आहे. मकाचे भाव २ हजार ९००ते ३ हजार २०० प्रतिक्विंटल मिळत आहे.

बाजरीच्या मागणीत वाढ

जालना मोंढ्यात रब्बीच्या बाजरीला चांगली मागणी होत आहे. बाजरीची आवक दररोज ३०० ते ५०० प्रतिक्विंटल होत आहे. बाजरी चांगल्या बाजरीला किरकोळ किराणा दुकानदार व ग्रामीण भागातुन मागणी होत आहे. बाजरी चे भाव अॅव्हरेज बाजरी २५०० ते २८०० मध्यम ३०००ते ३२००, उत्तम ३२००ते ३४०० असल्याची माहीती आडत व्यापारी संजय कानडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.