Tur dal price hike : कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8,480 रुपयांचा उच्चांक

तूर, कापूस, सोयाबीन व हरभरा या प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा
Tur dal price hike
कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8,480 रुपयांचा उच्चांकpudhari photo
Published on
Updated on

जालना : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी विविध शेतमालाची एकूण 12 हजार 910 क्विंटल आवक झाली. आजच्या बाजारात तूर, कापूस, सोयाबीन व हरभरा या प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा दिसून आला.

कापूस (सी.सी.आय.) ला क्विंटलमागे कमाल 8,010 रुपये, तर खाजगी कापसाला 7,360 रुपये दर मिळाला. तुरीच्या पांढऱ्या जातीस 8,480 रुपये कमाल, लाल तुरीस 8,302 रुपये, तर काळ्या तुरीस 8,350 रुपये दर नोंदविण्यात आला.

Tur dal price hike
Jalna solar power projects : 50 उपकेंद्रांसाठी 693 हेक्टर जमीन उपलब्ध

सोयाबीनला 5,500 रुपये कमाल व 5,200 रुपये सरासरी दर मिळाला. हरभरा (गावरान) ला 5,380 रुपये, तर गहू 2,675 रुपये कमाल दराने विकला गेला. ज्वारीस 4,400 रुपये, मक्याला 1,700 रुपये, बाजरीस 3,200 रुपये तर मूग व मसूरलाही मध्यम स्वरूपाचे दर मिळाले.

बुधवारच्या बाजार व्यवहारातून एकूण 7 कोटी 95 लाख 91 हजार 51 रुपये उलाढाल झाली. आवक व भाव स्थिर राहिल्यास आगामी काळात शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.

Tur dal price hike
Chatrapati Sambhajinagar Accident : ॲपे रिक्षाला दुचाकीची धडक, चिमुकल्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news