MSRTC Pass: 585 रुपयांत वर्षभर संपूर्ण राज्यात प्रवास; ही योजना कोणासाठी, कोणती कागपत्रे लागणार?

Amrut Jyestha Nagrik Yojana: अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत एसटी महामंडळाची नवी सुविधा
ST Bus
ST Bus Pudhari
Published on
Updated on

MSRTC St Bus Ticket Concession for senior citizens how to apply

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव आणि उपयुक्त योजना सुरू केली असून, त्यानुसार वयोवृद्ध प्रवाशांना केवळ ५८५ रुपयांमध्ये वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेला 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' असे नाव देण्यात आले आहे.

ST Bus
Alcohol Ban in Jalna : दारूबंदी, जुगार अड्डा बंद करण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

या योजनेचा लाभ ७५ वर्षपिक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. योजना अंतर्गत लाभार्थीना ५८५ रुपये भरून एक 'स्मार्ट कार्ड' तयार करून घ्यावे लागेल. हे कार्ड एकदा मिळाल्यानंतर, त्याचा उपयोग संपूर्ण वर्षभर अमर्याद आणि मोफत प्रवासासाठी करता येतो. 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत लाभार्थी राज्यभरातील साधी बस, शिवशाही, शिवशाही स्लीपर, शिवशाही शयन, शिवनेरी (जर लागू असेल त्या मार्गांवर) या प्रकारच्या एसटी बससेवांचा लाभ घेऊ शकतात, स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैध सरकारी फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया जवळच्या एसटी आगारात अथवा ऑनलाईन पोर्टलद्वारे पूर्ण करता येते.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुलभ, सवलतीचा आणि सन्माननीय प्रवास उपलब्ध करून देणे. त्यामुळे समाजातील या घटकाला सार्वजनिक वाहतुकीत सक्रिय आणि स्वावलंबी सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

ST Bus
Dhangar Samaj Reservation : बोऱ्हाडेंचे उपोषण सोळाव्या दिवशी सुटले

महामंडळाने काही दिवसांपूर्वी महिलांसाठीही अर्ध तिकीट सवलतीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी ओळखपत्रावरील माहितीचा वापर केला जात आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही घटकांसाठी एसटी प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा झाला आहे.

या योजनेचे स्वागत करताना अनेक सामाजिक संस्थांनी म्हटले की, सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे. अशा सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे.

या कागदपत्रांची गरज

७५ वर्षांवरील सर्व नागरिकांना महाराष्ट्र फक्त ५८५ (स्मार्ट कार्डसाठी) प्रवास करताना येणार आहे. हा प्रवास अमर्याद असणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व प्रकारच्या एसटी प्रवास करताना येणार आहे. यासाठी आधार, पॅन किंवा इतर सरकारी फोटो आयडी आवश्यक लागणार आहे.

स्मार्ट कार्ड कसे मिळवावे

जवळच्या एसटी आगारात किंवा ऑनलाईन अर्ज करून जर आपल्या कुटुंबात वयोवृद्ध सदस्य असतील, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ अर्ज करणे फायदेशीर ठरेल. ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news