Samruddhi Highway : समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्यापाऱ्यांचा बंद

बंदला संमिश्र प्रतिसाद, नवीन मोंढा कडकडीत बंद
Samruddhi Highway
Samruddhi Highway : समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्यापाऱ्यांचा बंद File Photo
Published on
Updated on

Traders' strike for the issue of farmers affected by Samruddhi Highway

जालना, पुढारी वृत्तसेवाः समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे रास्त मोबदल्यासाठी गेल्या ७५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. जालना जिल्हा व्यापारी महासंघाने समृध्दी बाधित शेतकऱ्यांच्या जमीनीला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुकारलेल्या बंदला बुधवार (१६) रोजी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Samruddhi Highway
Gram Panchayat Election : घनसावंगीत 96 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत

जालना जिल्हा व्यापारी महासंघाने समृध्दी बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनीला रस्ता भाव देण्याच्या मागणीला पाठिंबा देत बुधवारी बंद पुकारला होता. जमिनीच्या योग्य मूल्यांकनाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.

Samruddhi Highway
Maharashtra ST Service : जालना एसटी महामंडळाला विठ्ठल पावला, दोन कोटींचे उत्पन्न

सदर बाधित शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास एखादी अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन-प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही त्याची झळ पोहचण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news