

घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत मंगळवार (१५) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यात ९६ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींवर महिलाराज राहणार आहे.
घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये १३ ग्रामपंचायती या अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता तर ७ ग्रामपंचायती महिला संवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जमाती या सवर्गाकरिता २ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी एक महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता २६ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. १३ नागरिकांच्य मागास प्रवर्ग व १३ नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठयाद्वारे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर उर्वरित ५५ ग्रामपंचायती या सर्वसाधारणकरिता उपलब्ध झाल्या. त्यापैकी २८ जागा सर्वसाधारण महिलांकरिता राखीव काढण्यात आल्या.
अंतरवाली टेंभी, अंतरवाली दाई, उक्कडगाव, कंडारी अंबड, कंडारी परतूर, कोठाळा बु., खडका, खालापुरी, घोन्सी बु., जांबसमर्थ, जोगलादेवी, ढाकेफळ, पां गरा, बहिरेगाव, भादली,. चिचोली, मंगुजळगाव, माहेरजवळा, येवला, रांजणी, वडीरामसगाव, विरेगव्हाण तांडा, करडगाव, मासेगाव, राजेगाव, कृष्णपूरवाडी, बोलेगाव, चापडगाव
खडका वाडी, खापरदेव हिवरा, घानेगाव, घोन्सी खु., घोन्सी तांडा १,२, जिरडगाव, तळेगाव, देवीदहेगाव, दैठणा बु., भायगव्हाण, भूतेगाव, भोगगाव, मंगरुळ, मांदळा, राजाटाकळी, राणीउंचेगाव, लिंबोणी, शिंदेवडगाव, शेवगळ, शेवता, श्रीपत धामणगाव, सिंदखेड, गुंज बु., नागोबाची वाडी, कुंभार पिंपळगाव, अरगडे गव्हाण, गुरुपिंपरी
पानेवाडी, मुरमा खुर्द, सिध्देश्वर पिंपळगाव, पिंपरखेड बु., पाडुळी बु., चित्रवडगाव, दहिगव्हाण बु. या सात जागा अनुसुचित जाती महिलांसाठी, राहेरा, कोठी, रवना, देवडीहादगाव, लिंबी, निपाणी पिंपळगाव या सहा जागा अनुसुचित जाती सर्वसाधारण, अंतरवाली राठी (महिला चिठ्ठीद्वारे) मुद्रेगाव (सर्वसाधारण) या दोन जागा अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी बाणेगाव, बोंधलापुरी, साकळगाव, बोडखा बु., मानेपुरी, सरफगव्हाण, यावलपिंप्री तांडा, रामसगाव, पारडगाव, ड हाळेगाव, मूर्ती, आवलगाव बु., पिरगैबवाडी या चिठ्ठीद्वारे १३ जागा, दैठण खुर्द, बोरगाव, खु., बोररांजणी, भेंडाळा, मुढेगाव, मोहपुरी, यावलपिंप्री, रांजणीवाडी, शिवनगाव, हातडी, गाढेसावरगाव, देवहिवरा, बाचेगाव या नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी १३ जागा.