Jalna Crime News : धक्काबुक्की करून व्यापाऱ्याचे पावने दोन लाख पळविले

दानापूर येथील घटना, तीन जणांवर गुन्हा
Jalna Crime News
Jalna Crime News : धक्काबुक्की करून व्यापाऱ्याचे पावने दोन लाख पळविलेfile photo
Published on: 
Updated on: 

Trader robbed of ₹1.75 lakh after being jostled

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः सोने देण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करीत धमकावून १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे घडली आहे. या प्रकरणी जळगाव येथील एका सोनाराच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime News
Jalna News : आ. संतोष दानवेंकडून पिकांची पाहणी

जळगाव येथील जोशी पेठ भागात राहणारे व्यावसायिक संजय कालीपद महिती (वय ४६, व्यवसायः सोनार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, १९ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या साक्षीदाराला सोने देण्याच्या बहाण्याने दानापूर येथे बोलावून घेतले.

त्यानंतर त्यांना दानापूरपासून पुढील रस्त्याने काही अंतरावर नेऊन धक्काबुक्की व दमदाटी केली. आरोपींनी साक्षीदाराजवळील ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील १,८०,००० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली अन् घटनास्थळावरून पोबारा केला.

या प्रकरणी संजय महिती यांनी भोकरदन पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावर १५ सप्टेंबर रोजी रात्री ८:३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात कदीर शेख (रा. दानापूर, ता. भोकरदन), ९१७२७२३३०४ या भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर करणारा अज्ञात इसम आणि एक अज्ञात महिला यांचा समावेश आहे.

Jalna Crime News
Shivbhojan Thali : 'शिवभोजन' चालकांचे तीन महिन्यांचे अनुदान लटकले

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हवालदार बोर्डे यांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news