Jalna News : रब्बी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक

थम देण्याची जाचक अट, शेतकरी महिला, वृद्धांची कुचंबणा
Jalna News
Jalna News : रब्बी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूकfile photo
Published on: 
Updated on: 

Farmers face hurdles in obtaining Rabi crop insurance

अंबड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पीकविमा काढताना नव्या जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन विमा काढण्याची सुविधा असताना आता शेतकऱ्यांना सीएससी सेंटर किंवा अन्य विमा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून थम द्यावा लागत आहे. या अटीमुळे विशेषतः वृद्ध आणि महिला शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असून, अनेकजण विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jalna News
Jalna News : टँकर, चारा छावण्या, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

एकीकडे राज्य शासन दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत असताना दुसरीकडे विमा प्रक्रियेत कठोर नियम लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळीपूर्वी खरीप हंगामातील फळबागांचा विमा ओटीपीच्या माध्यमातून काढण्याची सुविधा होती.

मात्र, दिवाळीनंतर रब्बी पिकांच्या विम्यासाठी प्रत्यक्ष उपस्थिती आणि थम देण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रांवर जावे लागत असून, वयोवृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त शेतकऱ्यांना हा प्रवास करणे कठीण होत आहे. यंदा पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामही संकटात आहे.

Jalna News
जामखेडचे तलाठी कार्यालय कुलूप बंद

अशा परिस्थितीत पीकविमा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरू शकतो. मात्र, विमा काढण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी अडचणी वाढल्या आहेत. महिला शेतकऱ्यांना घरगुती जबाबदाऱ्या आणि शेतीची कामे सांभाळून विमा केंद्रावर जाणे जिकिरीचे ठरत आहे.

दिवाळीपूर्वी विम्यासाठी थम देण्याची आवश्यकता नव्हती, मग दिवाळीनंतर रब्बी पिकांच्या विम्यासाठी ही अट का लागू करण्यात आली, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियम शिथिल करण्याऐवजी प्रक्रिया अधिक कठीण केल्याने शासनाच्या धोरणावा नाराजी व्यक्त होत आहे. यात दुरुस्ती करण्याच मागणी होत आहे.

पर्यायी व्यवस्था करा

विमा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आवश्यक असल्या, तरी त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसू नये. रब्बी पीकविम्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुलभ करावी आणि वृद्ध, महिला व अशक्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.