Ganja Seized : जालना शहरात तीन किलो गांजा जप्त

६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Ganja Seized
Ganja Seized : जालना शहरात तीन किलो गांजा जप्तfile photo
Published on
Updated on

Three kg of ganja seized in Jalna city

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ६५ हजार रुपये आहे.

Ganja Seized
Jalna gambling den raid : भायगव्हाण शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ३० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कैकाडी मोहल्ला परिसरात गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

Ganja Seized
Jalna News : गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एक जण जेरबंद

या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान संशयीत कैलास राजू गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news