Jalna gambling den raid : भायगव्हाण शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

32 जण ताब्यात, 42 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त
Jalna gambling den raid
जालना ः घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 32 आरोपीं ताब्यात घेण्यात आले असून 42 लाख 43 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व तीर्थपुरी पोलिसांंनी संयुक्तरीत्या केली.

जालना जिल्ह्यातील जुगार खेळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह पथकास दिले होते.घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण शिवारात कल्याण बाबुराव चिमणे यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये काही इसमांना बोलावून पैशांच्या बदल्यात कॉईन देऊन व पैशांचा वापर करून झन्ना मन्ना जुगाराचा खेळ सुरू केला असल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व तीर्थपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

Jalna gambling den raid
Jalna Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गोंदी पोलिसांनी केली जेरबंद

यावरून करण्यात आलेल्या कारवाईत तीर्थपुरीकडे जाणाऱ्या रोडलगत भायगव्हाण शिवारात पोलिसांनी छापा टाकला यावेळी संशयित आरोपी भारत बाबूराव पठाडे, ( रा. भोगगाव ता. घनसावंगी),2) शिवाजी दगड्डु चौथे (रा. मांदळा, ता. घनसावंगी), 3) आकाश बाबुलाल तापडीया ( रा. तीर्थपुरी ता. घनसावंगी), 4) कैलास विठ्ठल ढेरे ( रा. बोडखा ता. घनसावंगी),5) संतोष मिश्रीलाल आबड ( रा. तिर्थपुरी ता. घनसावंगी), 6) विशीष्ट पाडुरंग केदार (रा. पिंपरखेड ता. घनसावंगी), 7) रंजीत दादाराव सोनवणे ( रा. बाचेगाव ता. घनसावंगी), 8) बप्पासाहेब निवृत्ती खाडे ( रा. मं. चिचोली ता. घनसावंगी), 9) गोविंद सिताराम सावंत (रा. सिंदखेड ता. घनसावंगी), 10) गोविंद मुर्लीधर लाभासे ( रा. गंगाचिचोली ता. अंबड ),11) सुरेश गुलाब राठोड (रा. देवी दहेगाव ता. घनसावंगी), 12) बळीराम भगवान सातपुते (रा. मं. चिचोली ता.घनसावंगी), 13) ओमप्रकाश भानुदास वांघुडे (रा. ताडहादगाव ता. अंबड ),14) अशोक चिमाजी शिंदे ( रा. तीर्थपुरी ता. घनसावंगी), 15) गजानन विक्रम टिळे ( रा. देवीदहेगव्हाण ता. घनसावंगी), 16) रामदास आसाराम पिसुळे ( रा. खापरदेव हिवरा ता. घनसावंगी,(17) जयकुमार प्रल्हाद जाधव (रा. घनसावंगी), 18) विलास धर्मराज कोल्हे ( रा. गुरुपिप्री ता. घनसावंगी), 19) बंडु किसन जाधव ( रा. राहेरा तांडा ता. घनसावंगी), 20) कैलास भिमराव मदनुरे ( रा. एकरुखा ता. घनसावंगी), 21) परमेश्वर लक्ष्मन गहीरे ( रा. गंगाचिचोली ता. अंबड), 22)विश्वभर गुलाबराव मुळे (रा. ताडहादगाव ता.अंबड शहापूर ता. अंबड) 26) पांडुरंग आंबादास बोबडे (रा. तिर्थपुरी) यांच्यासह 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jalna gambling den raid
Gutkha smuggling case : गुटखा घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई

या कारवाईत पोलिसांनी 68 हजार 720 रुपये रोख व 42 लाख 43 हजार 640 रुपये किंमतीच्या 04 कार, 22 दुचाकी, 28 मोबाईल व इतर साहित्य जप्त केले.सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार, पोउपनि राजेंद्र वाघ, मपोउपनि, प्रतिभा पठाडे यांच्यासह पोलिस अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, जगदीश बावणे, कैलास खार्डे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, आक्रुर धांडगे, किशोर पुंगळे, कैलास चेके सर्व स्था.पु.शा सह पोलिस अंमलदार अमर पोहार, नारायण माळी, भगवान शिंदे, कळसाहेब मंडलिक, विलास गाडेकर, विजय पवार, राजेंद्र जाटे यांनी केली आहे.

  • प्रतिष्ठीतांच्या या जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी विरुध्द सरकारतर्फे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, यांच्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news