गुढीपाडवा अन् ईदमुळे बाजार फुलला

ईदसाठी सेवया व सुकामेवा बाजारात; कपडे खरेदीसाठी गर्दी, मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा
jalna news
गुढीपाडवा अन् ईदमुळे बाजार फुललाfile photo
Published on
Updated on

The market boomed due to Gudi Padwa and Eid

जालना, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा व ईद हे दोन्ही सण यंदा गुरुवार, १९ मार्च रोजी एकाच दिवशी साजरे होत असल्याने जालना शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या दुहेरी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

jalna news
गुडीपाडवा, ईदसाठी तुफान गर्दी

गुढी पाडव्यानिमित्त गुढी उभारण्यासाठी लागणारे वेळू (बांबू), भगवे ध्वज, साखरेच्या गाठी, फुलांचे हार तसेच पारंपरिक वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. महिलांनी नवीन साड्या, दागिने व घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्याबर भर दिला आहे. तर पुरुष वर्गाकडूनही कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी उत्सुकता दिसून येत आहे.

दरम्यान, ईदच्या निमित्ताने बाज ारात शेवया, खजूर, ड्राय फ्रूट्स, मसाले आणि गोड पदार्थांच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी उसळली आहे. मिठाई दुकाने व किराणा व्यापाऱ्यांकडे ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे.

jalna news
साखर गाठीसाठी पिशोरची बनतेय नवी ओळख

याशिवाय, सणांच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याने वाहन विक्री केंद्रांवरही ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्याने व्यापाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत असून, यामुळे व्यापाराला चांगली चालना मिळत असल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण असून जालना शहर सणमय झाले आहे.

चार चाकी व दुचाकी शोरुम सजले

जालना शहरात गुढीपाडवा सणानिमित्त दुचाकी व चारचाकी वाहनांची चांगली विक्री होण्याचा अंदाज आहे. हिंदू बांधवांचा गुढीपाडवा व मुस्लिम बांधवांचा ईद हा सण एकाच दिवशी आल्याने वाहन विक्री चांगली होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news