रेंगेंकडून राज्यातील कठीण एएमके ट्रेक १४ तासांत पूर्ण

उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे यांनी जपला छंद
Jalna News
रेंगेंकडून राज्यातील कठीण एएमके ट्रेक १४ तासांत पूर्ण File Photo
Published on
Updated on

भारत सवने

परतूर : बंदोबस्त, गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कामात व्यस्त असतानाही आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे जपावे, याचा आदर्श वस्तुपाठ उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे यांनी घालून दिला आहे. रेंगे यांनी सायकलिंग आणि ट्रेकिंगच्या साहसी छंदाला कुटुंबाची साथ मिळाल्याने फिटनेसची एक नवी ओळख निर्माण केली आहे.

Jalna News
Jalna Political News : ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही : राधाकृष्ण विखे पाटील

कोरोना काळात परतूरचे डीवायएसपी रामेश्वर रेंगे यांनी सायकलिंगला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांच्या या छंदाला त्यांचा मुलगा अभिजीत आणि मुलगी अदिती यांनीही साथ दिली. ते रोज साधारण-पणे ३० ते ५० किलोमीटर सायकलिंग करतात, तसेच अनेकदा एकाच वेळी १०० किलोमीटर सायकलिंगचा टप्पाही सहज पार करतात. यामुळे त्यांच्या कुटुंबात फिटनेसची एक आरोग्यदायी सवय लागली आहे.

सायकलिंगसोबतच रेंगे यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक कठीण आणि ऐतिहासिक किल्ले त्यांनी सर केले आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर त्यांनी आतापर्यंत तब्बल दहा वेळा चढाई केली आहे. ऐतिहासिक किल्ले रतनगड आणि हरिहर गड प्रत्येकी चार वेळा तसेच राजगड, हरिश्चंद्र गड, शिवनेरी किल्ला त्यांनी यशस्विरीत्या पूर्ण केले आहेत. पुण्याच्या परिसरातील सर्वात कठीण मानला जाणारा कात्रज बोगदा ते सिंहगड नाईट ट्रेक त्यांनी पूर्ण केला, ज्यात सलग सतरा डोंगरांचा चढ-उतार असतो.

Jalna News
Gold Price High : सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी, १ लाख २० हजारांपर्यंत भाव

महाराष्ट्रातील आव्हानं पार केल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरा-वरही आपला साहसी प्रवास सुरू ठेवला. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी नेपाळमधील जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला. यामुळे त्यांचे कौतुक केले गेले.

एएमकेचा थरार १४ तासांत पूर्ण

डीवायएसपी रामेश्वर रेंगे यांच्या ट्रेकिंगमधील सर्वात मोठी आणि रोमांचक कामगिरी म्हणजे अलंग, मदन, कुलंग या दुर्ग त्रिकुटाचा ट्रेक. सह्याद्रीतील अत्यंत कठीण आणि एका दिवसात पूर्ण करणे जवळपास अशक्य मानला जाण-ारा एएमकेचा थरार ट्रेक त्यांनी केवळ १४ तासांत पूर्ण केला. या ट्रेकमध्ये रॅपलिंग आणि क्लाइंबिंग यांसारखी आवश्यक कौशल्ये वापरून त्यांनी स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news