मराठा, ओबीसी आरक्षण: वडीगोद्री येथील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

Maratha OBC Reservation Protest | ओबीसी समन्वयक व मराठा समन्वयक यांच्यात बैठक
Maratha OBC reservation protest in Wadigodri
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन्ही समन्वयकांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. Pudhari Photo
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक आमने-सामने येऊन घोषणाबाजी केल्याने शुक्रवारी (दि.२०) रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आज (दि.२१) पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. (Maratha OBC Reservation Protest)

२ किलोमीटर अंतरादरम्यान ३ वेगवेगळी उपोषणे सुरू

अंतरवाली सराटीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. तसेच सगेसोयरे अंमलबजावणी होण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केले आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी अंतरवाली सराटीत सोनियानगरमध्ये मंगेश ससाणे यांच्यासह पाच जणांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले आहे. तर दुसऱ्या दिवशी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ही ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसऱ्यांदा अंतरवाली फाट्यावर वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे वडीगोद्री ते अंतरवाली सराटी या २ किलोमीटर अंतरा दरम्यान ३ वेगवेगळी उपोषणे सुरू आहेत. (Maratha OBC Reservation Protest)

मोठा पोलिस फौजफाटा तैनात

तिन्ही उपोषणामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. घोषणाबाजी होऊ लागल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. रात्री पोलिसांनी रस्ता अडविल्याने तणाव निर्माण झाला होता. जरांगे पाटील यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी सांगितले. त्या नंतर वादविवाद टळला. आज दिवसभर गर्दी वाढल्याने पुन्हा परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सकाळपासून मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला. तसेच राज्य राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले. (Maratha OBC Reservation Protest)

गर्दी टाळण्यासाठी वाहतूक वळवली

पोलीस अधीक्षक यांनी वादविवाद टाळण्यासाठी प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. गर्दी टाळण्यासाठी अंतरवाली सराटीत जाण्यासाठी मराठा संयोजकांनी छञपती संभाजीनगर - बीड राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीतून डाव्या कालव्यावरुन वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मदत केली.

ओबीसी समन्वयक व मराठा समन्वयक यांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलना ठिकाणाहून मनोज जरांगे - पाटील यांच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या गाड्या वळविण्याचा निर्णयाबाबत एकमत झाले. पोलिसांनी दोन्ही आंदोलकांच्या समन्वयकांसोबत समन्वय साधला. त्यामुळे वादविवाद टळण्यास मदत झाली.
- अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक
Maratha OBC reservation protest in Wadigodri
मनोज जरांगे यांचा शुगर, बीपी कमी झाला: उपचारांची गरज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news