Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकरदन पोलिसांची धडक कारवाई
Illegal Sand Transport
भोकरदनः जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळू वाहतूक करणारा हायवासह पोलिस पथक. pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : निमगाव शिवारात तळ्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर भोकरदन पोलिसांनी कारवाई करत चालकाला अटक केली आहे. या कारवाईत हायवा वाहन व वाळूसह १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, (दि. १५) रोजी सकाळी ८ वाजता भोकरदन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांना निमगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस अंमलदार प्रशांत उबाळे व शरद शिंदे यांचे पथक घटनास्थळी रवाना केले.

Illegal Sand Transport
PM Kisan eKYC : १,२६५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

सकाळी ९:३० वाजता निमगाव शिवारातील तळ्याजवळ पोलिसांना वाळूने भरलेला एक विना क्रमांकाचा हायवा आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता चालक संदीप पंढरीनाथ पवार (रा. जवखेडा पवार, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना आढळून आला नाही.

याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १५,००,००० रुपये किमतीचा निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा हायवा तसेच २५,००० रुपये किमतीची वाळू (रेती), असा एकूण १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Illegal Sand Transport
Chhatrapati Sambhajinagar Municipal Audit : वर्षानुवर्षापासून रखडले मनपाच्या डझनभर विभागांचे ऑडिट

पथकाने केली कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पोलिस ठाण्याचे अंमलदार प्रशांत उबाळे, शरद शिंदे, विकास जाधव आणि संदीप भुतेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news