

Action against minor mineral transportation
शहागड : पुढारी वृत्तसेवा
अबंड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 52 वर धुळे-सोलापूर महामार्गावर आज (रविवार) सकाळी दोन हायवा ट्रकवर कारवाई करण्यात आली. जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार विजय चव्हाण यांना बातमी मिळाली की, गोदावरी नदीपात्रातून अवैध गौण खनिज उत्खनन होत असून, त्यांची वाहतूक होत आहे. साध्या वेशात टॅक्सीने प्रवास करत तहसीलदार विजय चव्हाण यांनी सहा ब्रास वाळूने भरलेल्या दोन हायवा ट्रकवर कावाई केली. दोन्ही वाहने तहसील कार्यालय अंबड येथे लावण्यात आलेली आसून वाहने ताब्यात घेतल्यानंतर ड्रायव्हर चालक पळून जाऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात आली.
महसूल पथकासोबत पोलीस बंदोबस्त मागून घेण्यात आला होता. या कार्यवाहीत एक कोटी एकोणीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही हायवा ट्रकवर वाहनांचे क्रमांक लिहिलेले आढळून आले नाहीत. वाहन वाहतूक करत असताना वाळू वाहतुकीची कोणतीही पावती अथवा चलन चालकांकडे आढळून आले नाही.
वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. यापुढेही अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे. जनतेस आव्हान करण्यात येते की, अवैध गोणखणीस वाहतूक होऊ नये या उद्देशाने नदी किनारी भारतीय नागरिक संहिता कलम १६३ ( CrPC144 ) संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
सदर वाहने अथवा रेती उत्खनन करणारे साहित्य अथवा अकारणास्तव्य व्यक्ती नदी पात्रावर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सदरील कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण, विष्णू जायभाय मंडळ अधिकारी, माने, तलाठी श्रीनिवास जाधव, विठ्ठल गाडेकर, चंद्रकांत खिलारे, सुलाने व श्याम विभुते, पपेश बुलबुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोल गुरले, मस्के पथकासाठी बंदोबस्तासाठी सोबत होते.