Teachers Morcha : शिक्षकांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

टीईटी सक्ती, संचमान्यता रद्द, जुनी पेन्शन सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन
Teachers Morcha
Teachers Morcha : शिक्षकांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावरFile Photo
Published on
Updated on

Teachers' march hits the District Collector's office

जालना, पुढारी वृत्तसेवा टीईटी सक्ती, संचमान्यता रद्द करावी आदींसह विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शुक्रवार दि. ५ रोजी शाळाबंद आंदोलन केले. यावेळी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

Teachers Morcha
Jalna News : कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांची पोलिसांनी केली सुटका; गुन्हा दाखल

दरम्यान, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबितच राहिल्यामुळे शिक्षक संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती जिल्हा जालना शाखेच्या वतीने शिक्षक पतसंस्थेतून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोहचला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यभर शाळाबंद आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांवर महामोर्चा काढण्यात आला. जालना जिल्ह्यातील सर्व संघटनांचा या मोर्चाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी समितीने जिल्हास् तरावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

Teachers Morcha
Jalana news: अंबड–घनसावंगी तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पेटणार

या आहेत मागण्या

प्राथमिक मागण्यांमध्ये शिक्षकांसाठी सक्तीचा निर्णय रद्द करणे, टीईटी प्रलंबिततेमुळे रोख-लेल्या पदोन्नती प्रक्रिया सुरू करणे, जुनी पेन्शन योजना बहाल करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता रद्द करणे, कमी पटसंख्या दाखवून शाळा बंद करण्याचे धोरण थांबवणे, शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित भरती, सर्व पदवीधर शिक्षकांना एकसमान वेतनश्रेणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, तसेच पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांच्या सेवासुरक्षेला मंजुरी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news