Jalna Crime News : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

आरोपी शिक्षकाला पोलिसांनी केले अटक
Chhatrapati Sambhajinagar News
Jalna Crime News : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारfile photo
Published on
Updated on

Teacher sexually assaults minor female student

जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरातील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये शिकणाऱ्या नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील एका शिक्षकाने अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवार, दि. १२ रोजी उघडकीस आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Teacher's Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणातील टोळीला मध्यरात्री अटक आणि सकाळी जामीन

यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कदम जालना पोलिसांनी आरोपी शिक्षक विक्की रॉबिनसन शिंदे (रा. गोकुळवाडी, जालना) याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

Chhatrapati Sambhajinagar News
Beed Crime | केज तालुक्यात नात्याला काळीमा; आजोळी आलेल्या १३ वर्षीय मुलीवर चुलत मामेभावाकडून तोंड, हात बांधून अत्याचार

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे गुरू शिष्य नात्याला काळिमा फासल्या गेली भावना व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news