Jalna News : बहिर नदीवरील पुलाच्या दुरवस्थेमुळे उसाचा ट्रॅक्टर पलटी !

शेतकऱ्याचे मोठे नुकसान, ग्रामस्थ आक्रमक
Jalna News
Jalna News : बहिर नदीवरील पुलाच्या दुरवस्थेमुळे उसाचा ट्रॅक्टर पलटी !file photo
Published on: 
Updated on: 

Sugarcane tractor overturns due to the poor condition of the bridge over the Bahir River!

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील एकरुखा ते सागर सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बहिर नदीवरील पुलाची दुरवस्था वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.

Jalna News
Jalna News : समांतर पाणीपुरवठा योजना : आजी माजीत श्रेयवादाची लढाई

याच पुलावरून उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना तो पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात एकरुखा येथील शेतकरी सोपान बापूराव मदनुरे यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले असून, ट्रॅक्टर मालक चंद्रकांत धाडगे यांच्या ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे.

सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने परिसरातून कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, बहिर नदीवरील पूल अत्यंत खराब अवस्थेत असल्याने या मार्गावरून अवजड वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Jalna News
तांगडे कुटुंबाच्या मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली

आज ट्रॅक्टरचे नुकसान झाले; उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. एकरुखा परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता सागर सहकारी साखर कारखान्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.