

Deputy Chief Minister Eknath Shinde has taken responsibility for the Tangde family's daughter—covering everything from her education to her marriage.
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना दौऱ्यावर असताना शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. या वेळी त्यांनी तांगडे कुटुंबातील मुलीची तिच्या संपूर्ण शिक्षणासह विवाहाची जबाबदारी स्वीकारली.
दरम्यान, आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणाला किंवा त्यांच्या भवितव्याला मर्यादा येऊ नयेत, या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे तांगडे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलीच्या स्वप्नांना शासनस्तरावरून मिळालेला हा पाठिंबा कौतुकास्पद ठरत आहे.
शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबाला केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर मानसिक आधाराचीही गरज असते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मिलपुरीतील तांगडे कुटुंबाच्या भेटीदरम्यान शिक्षण आणि विवाहाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा ही अशाच सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरली आहे.